पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फिरोदिया

इमेज
या शब्दाशी माझा पहिला संबंध आला मी सातवीत असताना. आईला तिच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेचं तिकीट दिलं होतं. मला नाटकांत कामं करायला आवडायची, म्हणून तिनं मला ते दिलं आणि मी त्या दिवशीचे प्रयोग बघितले. त्यानंतर या शब्दाशी संबंध आला तो अकरावीत असताना. पूर्व प्राथमिक फेरीत आम्ही या स्पर्धेत सादरीकरण केलं आणि प्राथमिक फेरीत ढकलले गेलो. तिथं आम्ही सादरीकरण केलं नाही ती गोष्ट वेगळी. त्याला अनेक कारणं आहेत. आता हे लिहिण्याचं कारण म्हणजे फिरोदिया शब्दाशी अगदी काल आलेला संबंध. अंतिम फेरीचं सकाळचं सत्र मी बघितलं. त्या तीन नाटकांपैकी दोन पहिल्या तीनात आली. ती दोन्ही मला टेक्निकल बाजूंनी खूप स्ट्राँग वाटलेली. पहिलं झालं ते 'यात्रिक' नावाचं नाटक. कथा वेगळी होती आणि छान रंगवली होती. मला सुरुवात जरा संथ वाटली; पण त्यांनी नंतर जो वेग पकडला त्याला काही तोड नाही. सेट फार उत्तम होता. प्रॉपर्टी वापरण्याची आयडिया भन्नाट होती. त्यातले लाईट, डान्स, गाणी आणि बाकीचे फाईन आर्ट छान झाले. सगळ्याची भेळ खूप छान झाली होती. दुसरं होतं ते 'जोर लगा के हैश्शा' नावाचं. यांची भेळ चांगली झाली होती एकंदरीत. पण म...

वेड लावणारा आणि लावणारं 'ग़ालिब'...

इमेज
हैं और भी दुनिया में सुख़नवर बहुत अच्छे, कहते हैं कि ‘ग़ालिब’ का है अंदाज़-ए-बयाँ और। म्हणजे, दुनिया में यूं तो बहुत से अच्छे शायर हैं, लेकिन ग़ालिब की शैली सबसे निराली है। ज्यांना ग़ालिब कोण हे माहीत नाही, त्यांच्यासाठी हे ग़ालिबनं स्वतःच लिहून ठेवलं आहे. मलाही ग़ालिब माहीत नाही. पूर्वी ओम भूतकरची प्रमुख भूमिका असलेलं नाटक कंपनीचं 'मी ग़ालिब' नावाचं नाटक बघितलं होतं. त्या वेळी फार आवडलं होतं. तेव्हा ग़ालिबचे शेर नाटकात बघितल्यानं / ऐकल्यानं फार आवडले होते. 'मी ग़ालिब' हे नाटक एकूण तीनदा बघितलं आहे. आणि 'सुखन'ही तीन वेळा बघितलं आहे. या सगळ्यात ग़ालिबचे शेर ऐकले आहेत आणि ते आवडलेही आहेत. पण आत्ता हा विषय काढण्याचं कारण वेगळं आहे. सध्या रंगभूमीवर 'ग़ालिब' नावाचं एक नवंकोरं नाटक आलं आहे. त्याचे दमदार प्रयोग सुरू झाले आहेत. गेल्या शनिवारी शुभारंभाचा प्रयोग पुण्यात 'यशवंतराव'ला झाला. तो मी बघितला. ग़ालिब हे नाव, त्यात विराजस काम करतोय आणि नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर हे ऐकूनच मी हे नाटक बघायला गेलो होतो. फार आवडलं. विराजसचं काम आवडतं मला...

कोल्हापूर दौरा

‘जब वी मेट’मध्ये शाहीद कपूरचं ‘आओ मिलों चलें...’ असं एक गाणं आहे. त्या गाण्यात तो आणि करीना प्रवास करताना दाखवले आहेत. तसं काही तरी करायची फार इच्छा होती. माझ्या नशीबानं अगदी त्याच्यासारखा नाही, पण थोडासा सिमिलर योग जुळून आला होता. (पण इथं शाहीदबरोबर करीना नव्हती.) नुकताच कोल्हापूरला गेलो होतो. २-३ दिवस होतो तिथं. जाताना आणि येताना वेगवेगळ्या गाड्यांमधून फिरलो. जाताना रात्री ११.३० वाजता कोंडूसरकरनं (एसी खासगी बस) निघालो. कोल्हापुरात गेल्यावर आत्याकडं असलेल्या मोपेडवरून फिरलो. ज्या गावाला कामासाठी जायचं होतं, तिथं जाताना सर्वांत जुन्या लाल डब्यानं गेलो. काय मजा आली बसमध्ये! सकाळी सव्वासातलाच बाहेर पडलो होतो. माझ्याबरोबर येणारे सरकारी अधिकारी जिथं थांबले होते, तिथं काकांनी मला सोडलं. सकाळी लवकर निघाल्यामुळं भूक लागली होती. बसमध्ये बसल्याबसल्या कोल्हापूर सोडायच्या आधीच डबा उघडला आणि फोडणीचा भात संपवला. फोडणीच्या भातापेक्षा फोडणीच्या पोळीनं आणखीन मजा आली असती. पण चालत्या गाडीत ती दह्याबरोबर हळूहळू चव घेत खाता आली नसती. त्यापेक्षा भात पटापटा कोंबता आला. बसला आधी काहीच गर्दी नव्हती. पुढच्या ...

भुताची खरीखुरी जाणीव

इमेज
हॉरर पिक्चर मी शक्यतो बघत नाही. आवडत नाहीत मला. काही तरी ओंगळवाणं, किळसवाणं दिसणार याची मी मनाशी आधीच खूणगाठ बांधतो आणि असे पिक्चर बघतच नाही.  असं असलं, तरी जाऊ दे, बघू तरी एकदा असं म्हणून या वेळी मी हॉरर जॉनर बघितला. आणि तोही पुण्यात. स्टेजवर. इंग्रजीतून. आत्ता तुम्ही इथं हे फुलस्टॉप वाचताय. पण थिएट्रॉन संस्थेनं जेव्हा १२ वर्षांपूर्वी त्यांचं हे पहिलं इंग्रजी हॉरर नाटक आणलं, तेव्हा त्यांना लोकांनी हेच शब्द प्रश्नचिन्ह घालून विचारले होते. हे मी माझ्या मनाचं काही सांगत नाही. विराजसनं हे स्वत: सांगितलं भरत नाट्य मंदिरात उभं राहून. काहीही झालं तरी ’ॲनाथिमा’ या नाटकाची स्टोरी मी सांगू शकत नाही. हे एक सस्पेन्स हॉरर नाटक आहे. त्यामुळं मी थोडं जरी बोललो, तर नाटकातली मजाच जाईल. पण एका गोष्टीची गॅरंटी. हे नाटक एकदा बघितल्यानंतर पुन्हा पुन्हा बघायची इच्छा होईल. पहिल्यांदा जेव्हा नाटक बघू, तेव्हा स्टोरी बघू. एकदा ती समजली की मग पुढच्या वेळी बघताना तांत्रिक गोष्टी उलगडतील. त्याच्या पुढच्या वेळी बघताना सगळी कॅरेक्टर्स उलगडत जातील. आणि त्याच्यानंतर ज्या ज्या वेळी बघू, तेव्हा जर काही चुका झाल्या ...

लोनली लूपचा भोवरा

इमेज
गावात माणसं कितीही कमी असली, तरी माणूस कधी एकटा पडत नाही; पण शहरात माणसांच्या प्रचंड गर्दीत तो एकटा पडतो, असं कुठं तरी ऐकलं होतं. खरं तर या वाक्याचा माझ्या पोस्टशी काहीच संबंध नाही. पण सुरुवात काही तरी भारी व्हावी असं वाटलं, म्हणून चिकटवलं हे वाक्य. विषयाला डायरेक्ट हात घालू. थिएट्रॉनचं ‘भंवर’ हे नाटक मी दुसऱ्यांदा बघितलं. पुन्हा एकदा तेवढंच आवडलं. नाटकाची मजाच ती आहे. जेवढ्या वेळा बघू, तेवढं ते नवं वाटतं. प्रत्येक वेळी काही तरी नवीन सापडतं. ऑनस्टेज घेतलेल्या ॲडिशन्स, सेटमधला बदल, लाईट किंवा म्युझिकमधले बदल, त्यात आलेल्या अडचणी, कलाकारांचे फंबल्स अशा सगळ्या गोष्टी समजतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजते, ती म्हणजे रिपीट आणि नव्यानं आलेले ऑडियन्स. बाकी सगळ्या गोष्टींकडं तर लक्ष असतंच आपलं. पण ऑडियन्स हा प्रकार मला जास्त आवडतो. त्यांच्यात दिसणारे बदलही खूप आवडतात. थिएट्रॉनचा आत्ता नुकताच महोत्सव झाला. त्यात मी ‘भंवर’ बघितलं. पूर्वी फर्ग्युसन कॉलेजच्या ‘किमया’मध्ये झालं होतं, तेव्हा बघितलेलं. त्या वेळी जागेमुळं काही गोष्टी राहून गेल्या असाव्यात कदाचित. पण मला त्या या वेळी भरत नाट्य मंद...

मापात वाढलेली भक्कम वार्ता

इमेज
लहानपणी आपण सगळे कानगोष्टी खेळलो आहोत. गोलात बसायचं आणि एकाने सांगितलेलं लांबलचक वाक्य शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायचं. कानात हे सगळं सांगताना सुरुवातीचं वाक्य कधीच तसंच्या तसं सांगितलं जात नाही. पण त्यात फार मजा येते. आता वयानं मोठे झाल्यावर या कानगोष्टीतून मजा नाहीशी होते आणि त्याची जागा घेते अफवा. फरक एकच आहे. कानगोष्टी खेळताना सगळ्यांनाच त्याची मजा येते; पण अफवा असेल, तर त्याची सुरुवात केलेल्या माणसालाच पुढं होत जाणाऱ्या फजितीची मजा येते. नमनाला घडाभर खूप झालं. ही सगळी बडबड करण्यामागं कारण आहे. ‘वार्ता वार्ता वाढे’ नावाचं एक नाटक बघितलं नुकतंच. त्यामुळं ही नको ती फिलॉसॉफी झाडायची इच्छा झाली. नाटकाच्या नावातच गंमत आहे आणि नाटकात काय असेल याचा अंदाज नाटकाचं पोस्टर आणि नाव बघितलं तर येऊ शकतो. पण नुसता अंदाज घेऊन उपयोग नाही. ते नाटक प्रत्यक्ष बघायला पाहिजे. एखादी गोष्ट किंवा खबर किंवा बातमी आपण कशी वाचतो, ऐकतो किंवा बघतो यावर खूप गोष्टी अवलंबून असतात. शिवाय आपल्यापर्यंत या गोष्टी कशा पोहोचतात, यावरही बरंच काही अवलंबून असतं. नाटकात एका संपूर्ण गावाची गोष्ट सांगितली आहे. या गावात नीट रें...

समाजाने ठरवलेले बिल्डिंगचे मजले

इमेज
सामाजिक आणि आर्थिक विषमता, श्रीमंत-गरीब दरी, उच्च-नीच, भेदभाव अशा प्रकारचे सगळे शब्द जर गूगलला टाकले ना, तर याविषयी जे लेख किंवा बातम्या येतील, ते वाचून आपलं मानसिक स्वास्थ्य हरवतं. काही वेळेला तर अतिशयोक्ती बघून डिप्रेसिंग वाटतं. पण जे वास्तव आहे, ते तर आपल्या कोणालाच नाकारता येणार नाही. ही विषमता काय, जगात काय चाललंय हे घराबाहेर पडून बघावंच लागेल. हे सगळं विस्तारानं; पण कमी वेळात समजावून घ्यायचं असेल, तर त्यासाठी एक सोपा उपाय सांगतो. ‘थिएट्रॉन’ संस्थेचं ‘ऊँची है बिल्डिंग’ नावाचं नाटक बघा. दीड तासाच्या दीर्घांकात समाजाचे भाग आपल्याला दिसतात. एवढंच नाही, तर समाजाचे हे भाग जे वागतात, त्यामागचं कारणही सांगण्याचं काम त्या नाटकात उत्तम प्रकारे झालं आहे. हे नाटक बघा म्हणून सांगतोय त्याचं आणखी एक कारण आहे. मगाशी म्हणालो, तसं हा गंभीर विषय यात विनोदी पद्धतीनं मांडला आहे. पण उगाचच कॉमेडी करायची म्हणून केलेली नाही किंवा कोणताही विनोद ओढूनताणून झालेला नाही. प्रत्येक विनोदामागं आपल्याला विचार करावा लागतो. म्हणजे विचार करायचा की नाही हा पूर्णपणे ऐच्छिक भाग जरी असला, तरी डोळे आणि कान उघडे ठेवून समा...

कोऱ्या मनावरच्या काळ्या नोंदी

इमेज
पूर्वी घडलेल्या कोणत्या तरी गोष्टीचं बॅगेज काही लोक आयुष्यभर बाळगतात. हे लोक स्वत:चाच तिरस्कार करायला सुरुवात करतात. आपल्या आजूबाजूला आपण किती तरी असे लोक बघतो. काही वेळा आपण स्वत:च ‘ते’ लोक होऊन जातो; पण नकळतच. मी सांगतोय त्याची उदाहरणं द्यायचा प्रयत्न करतो. नोकरीत काही सहकारी किंवा वरिष्ठ आपली काहीच चूक नसतानाही आपल्याला त्रास देतात. त्याचं काय कारण असेल, याचा विचार आपण करत बसतो. त्यांच्याशी हळूहळू बोलायला सुरुवात केली, त्यांचा विश्वास संपादन केला, तर आपल्याला लक्षात येतं, की ते आपल्या जागी असताना त्यांच्याशी त्यांचे सहकारी आणि वरिष्ठ असेच वागलेले असतात. त्यामुळे नकळतच तेही आपल्याशी तसंच वागायला बघतात. अनेक शिक्षक आपल्याला लहानसहान गोष्टींवरून ओरडत असतात किंवा ओरडलेले असतात. त्याचं कारण काय? एक तर आपण आयुष्यात खूप पुढं जावं अशी त्यांची अपेक्षा असते किंवा त्यांना त्यांच्या लहानपणी त्यांचे शिक्षक असेच ओरडलेले असतात. त्यामुळं हे शिक्षकही आपल्याशी थोडे रूड वागू शकतात. याउलट दुसरी जमात म्हणजे, सगळ्यांबरोबर मिसळायचा प्रयत्न करणारी. यांना कोणीही आपल्यात मिसळून घेत नसतं. त्यामुळं हे लोक, विश...