पोस्ट्स

जानेवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तरुणाई

इमेज
 ‘आमच्या वेळी हे असं नव्हतं.’ असं पुण्यात कुठल्याही भागातून, संस्थांमधून ऐकू येऊ शकतं, हे पुलंनी लिहून ठेवलेलं आहे. पण ते बिचारे फक्त पुण्याच्या बाबतीत लिहून गेले. सध्या त्याच्या पुढची लेव्हल आली आहे.  ‘आजकालची ही पोरं म्हणजे...’ असं किंवा अशा अर्थाचं वाक्य आपल्याला कुठंही गेलं तरी ऐकू येतं. भविष्यात हे असं सगळीकडं ऐकू येईल आणि तेही मुख्यतः तरुणाईच्या बाबतीत, हे पुलंना कसं ठाऊक असणार!  म्हातारी माणसं मध्यमवयीन लोकांबद्दल, मध्यमवयीन नोकरदार लोक तरुणाईबद्दल आणि तरुण लोक शाळकरी पोरांबद्दल 'आजकालची ही पोरं म्हणजे...' म्हणताना दिसतात. सध्या भारतात तरुणवर्ग जास्त असल्यानं आपण त्यांच्याबाबतच बोलूया. का असं वागत असतील तरुण पोरं आणि पोरी? बेदरकार वागून काय मिळवत असतील ते? असे प्रश्न ठरावीक वयोगटापेक्षा मोठ्या वयाच्या लोकांना पडून उपयोग नाही. ते प्रश्न त्या त्या वेळी त्यांचे त्यांनाच पडले पाहिजेत; पण ते तरुण असतील तेव्हाच! एकदा तारुण्य ओसरल्यावर हे प्रश्न पडून किंवा झालेल्या चुका लक्षात येऊन काय उपयोग? मग ते पुन्हा समजावणाऱ्या मध्यमवयीन लोकांच्या रांगेत जाणार आणि नव्या तरुण पिढीवर ...