पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रिकामा वेळ

इमेज
तर.... माझ्याकडे सध्या भरपूर रिकामा वेळ आहे, म्हणून मी हे लिहितोय. तुमच्याकडेही तसाच रिकामा वेळ असेल, तर वाचा. नाही तर सोडून द्या. लिहायचं तर बऱ्याच दिवसांपासून होतं. खूप सहन केलं आधी; पण आता सहन होत नाही असं म्हणणार नाही, तर वेळ आहे म्हणून लिहितोय असं म्हणीन. कोणाकडे असतो हा रिकामा वेळ? बऱ्याच जणांकडे असतो. ज्यांच्याकडे नसेल, त्यांना तो काढताही येतो. पण सगळेच काही मी लिहितोय तसं लिहीत बसत नाहीत ना! तसं जर त्यांनी केलं असतं, तर गहजब उडाला असता. पण ते मेंदूचा वापर करत असतील थोडासा म्हणून लिहीत नसावेत. पण त्यांचं आपल्याला काय करायचं आहे? फेसबुक फुकट आहे. लिहायलाही आणि वाचायलाही. त्याला जर आधीच्या फोन व्यवस्थेप्रमाणं पैसे मोजायला लागले असते ना, तर तथाकथित व्यथित होणारे लोक इकडं फिरकलेही नसते. फुटक ते पौष्टिक; शिवाय इथं फेसबुकवर जो लिहितो, तिथं त्याचे त्याचे चाहते (दत्तू) ठरलेले असतातच की. त्यामुळं घे फेसबुक, की लिही पोस्ट. मुद्दा भरकटतोय असं तुम्हा वाचणाऱ्यांना वाटायला नको, म्हणून पुन्हा मुद्द्याकडं येतो. नाही तर मला वेळ आहेच रिकामा बाकीची बडबड करायला. हा रिकामा वेळ मुख्यत: नवनिवृत्त किंव...