पोस्ट्स

डिसेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नैराश्याची सोशल जाहिरात

इमेज
'खूप वाईट वाटतंय. निराश झाल्यासारखं वाटतंय आणि त्यामुळं काय करावं हे सुचत नाहीए,' अशा आशयाची एक पोस्ट समाजमाध्यमावर वाचली; पण त्यावर असंख्य लाइक्स दिसले. त्या पोस्टवर 'काय झालं' अशा अर्थाच्या कमेंट कमी होत्या. किती लोकांनी त्या पोस्टकर्त्याला भेटून कारण विचारलं असेल किंवा निदान फोन केला असेल? या अशा प्रकारच्या अनेक पोस्ट्स आजकाल 'व्हायरल' झालेल्या दिसतात. त्यांना लाइक्स भरपूर असतात; पण खरी मदत किती मिळते, हा चर्चा करण्याचा विषय आहे. मुख्यतः या पोस्ट्स स्क्रोल केल्या जातात. मुळात आपल्याला एवढं निराश झाल्यासारखं वाटतंय, तर आपण आपल्या कुटुंबियांशी, मित्र-मैत्रिणींशी का बोलत नाही? जर यांपैकी कोणाशी संवाद साधायला लाज किंवा संकोच वाटत असेल, तर एखाद्या समुपदेशकाची मदत घ्यायला काय हरकत आहे? आजकाल विशेषतः तरुणाईमध्ये लहान सहान गोष्टींवरून नाराज होण्याचं आणि निराश होण्याचं वाढतं प्रमाण आहे. बऱ्याच वेळा कुटुंबासोबत साध्या कारणावरून वाद झाला की नाराजी, कधी छोटं जरी अपयश आलं की नाराजी किंवा रोज बोलणारी एखादी व्यक्ती बोलली नाही की लगेच नाराजी व्यक्त केली जाते. या नाराजीलाच का...

शर्माजी का लड़का

इमेज
आठवले का मिम्स? व्हॉट्सॲपवर फिरणारे मेसेजेस? कधी काळी जाहिरातीतही ‘शर्माजी का लडका’ची कन्सेप्ट प्रचंड फेमस होती. त्यातून मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये होणाऱ्या तुलनेवर बोट ठेवलं होतं. त्याचाच आधार घेऊन थोडं मनात आलं ते मांडतो. मात्र, मला जे म्हणायचं आहे, ते फक्त मुलाला लागू होणार नाही. त्यात मुलगीही येणार. म्हणून आता लिहिताना मला आणि वाचताना तुम्हाला सोपं जावं असा विचार करून तरुणी किंवा तरुण, मुलगा किंवा मुलगी असं प्रत्येकवेळी उलगडून न सांगता लिखाणाच्या सोयीसाठी म्हणून मुलं, मुलाला असे उल्लेख करतो. तर... मध्यमवर्गीय पालक, त्यांची मुलं, मुलांचं शिक्षण आणि त्यांच्यावर असणारा ताण याबाबत थोडं बोलायचं होतं. आपण कितीतरी वेळेला वाचतो किंवा आजूबाजूलाच बघतो की,  १. ‘रिक्षावाल्याचं मूल अमुक झालं’ २. ‘घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही मुलानं अपरिमित कष्ट करून पटकाविली तमुक पोझिशन’ ३. ‘श्रीमंत आईवडील असूनही त्यांचा मार्ग सोडून वेगळा मार्ग निवडला आणि ते मूल झालं आणखी काहीतरी’  अशी हजारो उदाहरणं देता येतील; पण ती फक्त गरीब आणि श्रीमंत या दोघांबाबतच सीमित राहतील. उरला कोण, तर मध्यमवर्ग. तोस...