पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

इंद्रधनुष्य

इमेज
  "होय. घरीच येतोय. निघायला उशीर झाला, त्यामुळं आता बस मिळत नाही. जरा उभं राहायला जागा असलेली बस मिळाली, की लगेच येतो." वैतागूनच फोन ठेवला. फोनवर बोलताना माझा आवाजही थोडा वाढला होता. त्यात इअरफोन असल्यानं मी जरा मोठ्यानं बोलत होतो. एकूणच माझ्या अशा वागण्यानं बस स्टॉपवरचे लोक माझ्याकडं बघत होते. पण उसनी बेफिकिरी चेहऱ्यावर आणत आणि काहीही न झाल्यासारखं दाखवत मी पुन्हा फोनमध्ये डोकं घातलं. एकतर शनिवार, त्यात निघायला झालेला उशीर. कधी एकदा घरी जातोय असं झालं होतं. माझ्यासमोरून २-३ बस गेल्या. एका बसमध्ये चढायलाही जागा नव्हती. बाकी २ बसमध्ये तर कंडक्टरनं चढू दिलं नाही. 'मागून बस येत आहेत' म्हणाले दोघंही. शेवटी मला हवी असलेली बस आली एकदाची. संध्याकाळची वेळ असल्यानं त्यात बसायला जागा नव्हतीच. शिवाय उभं राहायलाही फार कमी जागा होती. तरी 'ही बस काही सोडायची नाही' असं ठरवून ती बस थांबता थांबताच मी आत घुसायचा प्रयत्न केला. पण माझ्या मागून 'एक मिनिट, एक मिनिट' असा कानाला छान वाटणारा आवाज आला. मी मागं वळून बघू शकलो नाही; पण एका बाजूला होऊन 'त्या आवाजाच्या मालकिणीला...