पोस्ट्स

मार्च, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बसप्रवासी

इमेज
मनातल्या मनात बसला शिव्या घालत उभा होतो. उन्हात. चेहर्‍यावरून घामाच्या धारा वाहत होत्या, शेवटी आली एकदाची बस. माझ्या सीटचा नंबर सांगितला आणि जागेवर जाऊन बसलो खिडकीतून बाहेर बघत. वैतागलो होतो.  दिवसभर काम केलं, गाडी मेहेंदळे गॅरेजजवळ लावली आणि रिक्षा मिळेल म्हणून रस्त्याने मागे बघत बघत येत होतो. वाटेत बस सुटू नये म्हणून चालकाला फोन करून सांगत होतो की, "बाबा येतोय मी. मला घेतल्याशिवाय जाऊ नको." तर तो म्हणाला, "लगेच या बस लागली आहे."  रिक्षा काय मिळाली नाहीच शेवटी. चालत, पळत दांडेकरला पोहोचलो तर जागेवर बस नाही. एकाला विचारल्यावर तो म्हणाला, "येईल थांबा. तिकडं सामान भरून घेतायत बसमध्ये." जे डोकं फिरलं होतं माझं. पण आली एकदाची बस आणि मी गार वारं खात खिडकीतून बाहेर बघत बसलो. मी बाहेर बघत असतानाच "Excuse me!" अशी मधाळ आवाजातली हाक (बहुतेक मलाच मारलेली) ऐकू आली. मी उजवीकडे बघितलं. गव्हाळ रंगाच्या कपाळावर हलकी घामाची धार, केसाला बहुतेक मागं क्लिप लावली होती, खांद्याला टेकतील अशी चंदेरी लांबडी कानातली, आकाशी रंगाचा टॉप, काळी जिन्स आणि एका खांद्यावर सॅकचा ए...