पोस्ट्स

जुलै, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लग्न

इमेज
सकाळी एका लग्नाला गेलो होतो. मुंज, लग्न, रिसेप्शन अशा गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांना जरा लवकर जायचं असतं. कोपऱ्यातल्या एखाद्या जागेवर बसून सगळीकडे नजर पोहोचते मग. हा विचार करून गेलो होतो लवकर. तिथं जेमतेम १० लोकं आली होती. नंतर झाली गर्दी. सुरुवातीला एक लहान मुलगी सगळ्यांना विचारत होती, 'तुम्ही वरपक्ष की वधूपक्ष?' वधूपक्ष असं सांगितलं तर छातीला लावायचा बॅच देत होती. त्यावर नथ होती आणि वधूपक्ष असं लिहिलेलं होतं. वरपक्ष असं म्हटलं तर हसत होती नुसती. दोन-चार जणांनी तिला विचारलं, 'आम्हाला नाही देणार का बॅच?' ती म्हणे, तुम्हाला वरपक्षवाले देतील.' मग मी आजूबाजूला बघितलं, तर दोन्ही प्रकारचे बॅच लावलेली माणसं फिरताना दिसली. त्या मुलीनं मलाही विचारलं, मी नको म्हणालो बॅच. सायन्स प्रोजेक्ट फेअरला गेल्यासारखं वाटलं असतं मला. वरपक्षाच्या बॅचवर पगडी होती आणि वरपक्ष असं लिहिलेलं होतं. त्यानंतर थोड्या वेळानं आणखी एक मुलगा आला आणि त्यानं तोच प्रश्न विचारला मला. त्यालाही नको म्हणालो मी. आता गर्दी झाली होती बऱ्यापैकी. लग्न लागलं होतं. नवरा आणि नवरी जुजबी फोटो काढून चेंज करायला गेले होते...

तप्त उन्हातली थंडगार झुळूक

इमेज
मे महिन्याची संध्याकाळ होती. सरकारी दौऱ्याचं कारण देऊन माझ्या ‘खौट’ बॉसनं हिंगोलीला पाठवलं होतं. तसं बघायला गेलं, तर सरकारी दौरा म्हटल्यावर सर्व सोयीसुविधा असतात. उन्हाळा जाणवणार नाही अशा एसी रुम्स, दिमतीला एक ड्रायव्हर आणि जेवणाची उत्तम सोय. पण एकट्यानं नव्या प्रदेशात, तेही हिंगोलीसारख्या... माझ्या अगदी जिवावर आलं होतं. काय करावं म्हणून शनिवारची सुट्टी बघून नांदेडला जाऊन यायचं ठरवलं. सुट्टीच्या दिवशी ड्रायव्हरला त्रास नको म्हणून लाल परीनं निघालो. गुरुद्वारा वगैरे पाहून संध्याकाळी सातच्या सुमारास हिंगोलीला पोहोचलो. मला जायचं होतं औंढ्याला; कारण माझी राहायची सोय तिथल्याच विश्रामगृहात केली होती. मी अगदी ‘पुणे-मुंबई’सारखी कनेक्टिव्हिटी असल्याच्या आविर्भावात चौकशी कक्षात जाऊन औंढ्याला जाणाऱ्या गाडीची चौकशी केली. समोरून कपाळावर आठी आणून उत्तर आलं, ‘आता गाडी नाही. टमटम पकडा.’ तसं हिंगोलीपासून औंढा फक्त २०-३० किलोमीटरवर आहे; पण दररोज दिमतीला ड्रायव्हर असल्यानं हे अंतर कधी जाणवलंच नाही. आता मात्र पंचाईत झाली होती. वातावरण ढगाळ व्हायला लागलं होतं आणि भूकपण फार लागली होती. उकाड्याबद्दल तर बोलायल...