पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मिकी

इमेज
मिकी वडिलोपार्जित व्यवसाय असताना तो पुढे सुरू न ठेवता मुलाला स्वत:चं काही तरी वेगळं करायचं आहे, ही झाली घराघरांत दिसणारी एक सिच्युएशन. पण यावर किती वेगळ्या पद्धतीनं विचार होऊन काय काय होऊ शकतं, हे आपण अनेक सिनेमांमधून बघितलं आहे. मग त्यात येणारी रडारड, नको इतके इमोशनल सीन हे सगळं आलंच. नाटकातही त्याला वेगळा अपवाद येणार नाही, असं वाटत होतं. पण ‘मिकी’ हा एक स्ट्राँग अपवाद आहे. मुळात ‘मिकी’मध्ये अशी काही स्टोरी असेल, हेच मुळात वाटलं नव्हतं. सन १९८४मध्ये पुणे शहरात केशकर्तनालय (सलून) कसं असेल, त्याचा उत्तम सेट पडदा उघडल्यावर आपल्या समोर येतो. सखाराम (विराजस कुलकर्णी) यांचा हा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. त्यांचा मुलगा केशव (शिवराज वायचळ) हा व्यवसाय व्यवस्थित सांभाळतोय. त्याला अँथनी (सूरज पारसनीस) हा मित्रही मदत करतोय. दुकानाच्या जागेचा मालक पैशांचा तगादा लावत असल्यानं सखाराम आणि केशव त्रस्त आहेत. यावर उपाय आहे; पण त्यांच्या हाताला तो सहजासहजी लागणारा नाही. त्यांच्या एका चुलत भावाच्या नावावर बरीच प्रॉपर्टी आणि रक्कम सखारामच्या वडिलांनी करून ठेवली आहे. पण तो बेपत्ता आहे. त्यात केशवच...