पोस्ट्स

द व्हाइट टायगर

इमेज
द व्हाइट टायगर शोषण, दारिद्र्य, गरिबी, भ्रष्टाचार, जातीयवाद हे सगळे मुद्दे किंवा यापैकी किमान काही तरी भारतीय सिनेमांत आता असतातच असतात. अनेक वेळेला चघळून चोथा झालेले हे शब्द असले, तरीही त्यांचा वापर नव्याने केला जातो, तेव्हा ते वेगळेपण उठून दिसतं. 'द व्हाइट टायगर' या सिनेमातही हे वेगळेपण उठून दिसतंय. हा सिनेमा २०२१मध्ये अमेरिकेत प्रदर्शित झाला आणि आपल्याकडे थेट नेटफ्लिक्सवर आला. अरविंद दिगा यांनी लिहिलेल्या 'द व्हाइट टायगर' या पुस्तकावर आधारित हा सिनेमा आहे. २००८ साली प्रकाशित झालेल्या या इंग्रजी भाषेतल्या पुस्तकाला त्याच वर्षीचा ४०वा बुकर पुरस्कारही मिळाला आहे. साधी, नेहमीचीच वाटणारी; पण एक सुंदर कथा आहे. भारताच्या एका खोपच्यातल्या खेडेगावातून एक मुलगा दारिद्र्याला वैतागून मोठ्या शहरात जातो आणि कधी परिस्थितीचा, तर कधी माणसाचा पायरी म्हणून वापर करून एक मोठा उद्योजक होतो. पण या साध्या गोष्टीची मांडणी उत्तम केल्यानं सिनेमा बघावासा वाटतो. बलराम हलवाई (आदर्श गौरव) एका खेड्यात अतिशय हालाखीच्या परिस्थितीत दिवस काढतोय. त्याचे वडील कमवून आणलेले सगळे पैसे त्याच्या आ...

चेहरे

इमेज
चेहरे किसी रोज़ तुम से मुलाकात होगी मेरी जान उस दिन मेरे साथ होगी मगर कब ना जाने ये बरसात होगी मेरा दिल है प्यासा मेरा दिल अकेला ज़रा तस्वीर से तू निकल के सामने आ मेरी महबूबा मेरी तक़दीर है तू मचल के सामने आ मेरी महबूबा मेरी महबूबा काही सिनेमे पाहिल्यानंतर त्यातली गाणी मनात घर करतात, तर काही सिनेमे न पाहताच त्यातली गाणी ती जागा मिळवतात. ही गाणी कधी पहिल्यांदा ऐकलेली असतात, ते आठवतही नाही; पण ती परत कधी तरी ऐकल्यावर काही तरी डोळ्यासमोर दिसत राहतं, काही सिनेमातले रेफरन्स डोळ्यासमोरून सरकत जातात किंवा काही चेहरे पाहिल्यानंतर अशी ही गाणी आठवत राहतात. मग ती सर्च करून करून ऐकली जातात. तसंच परदेस पिक्चरमधलं हे गाणं. अचानक आठवलं, का कुठं कोणी गुणगुणताना ऐकलं ते आता आठवत नाही. पण डोक्यातून जाईना. त्यामुळं डोक्यात फिट्ट बसलेला गीता गोविंदममधला सीन पुन्हा डोळ्यासमोर नाचायला लागला. विजय देवरकोंडासमोर त्याचं लग्न ठरताना आणि होतानाची प्रोसेस दिसत असते. पण समोरची ती मुलगी कोण, हे त्याला माहीत नसतं, म्हणजे तिचा चेहरा दिसत नसतो. एके दिवशी तो रश्मिकाला कुठं तरी पाहतो आणि तो अस्पष्ट, धूसर चेहरा ...

महामाया निळावंती

इमेज
महामाया निळावंती आपल्याला कोणतीही एखादी गोष्ट हवी असेल किंवा काही साध्य करायचं असेल, तर त्यासाठी थोडी मेहनत करावी लागते. फार मेहनत केली, तर त्याची चांगली फळं मिळतात. पण मेहनत ही आलीच. ‘अगर तुम किसी चीझ को दिल से चाहो, तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है,‘ हा ‘ओम शांती ओम’मधला डायलॉग संपूर्ण खरा नाही. काही अंशीच तो प्रत्यक्षात येऊ शकतो. असाध्य ते साध्य करण्यासाठी लागते, ती दुर्दम्य इच्छाशक्ती. ही नेमकी कशाशी खातात, ते जाणून घ्यायचं असेल, तर सुमेध लिखित निळावंती वाचायला पाहिजे. पण एक गोष्ट आधीच सांगतो, की या कादंबरीमध्ये जी इच्छाशक्ती आहे, ती चांगली नाही. ती सर्वनाशाकडे घेऊन जाणारी आहे, हेही तितकंच खरं आहे. निळावंती या कादंबरीबद्दल बऱ्याच लोकांनी लिहिलेलं वाचलं होतं. म्हणजे अर्थातच कौतुक. कारण ही एक रहस्य उलगडणारी कादंबरी आहे. ४०० वर्षांपूर्वी सह्याद्रीच्या जंगलात राहणाऱ्या निळावंतीशी बाजिंद्याने स्वतःच्या फायद्यासाठी लग्न केलं. तिच्याकडून पशुपक्ष्यांची भाषा शिकून घेतली आणि नंतर तिचा खून केला. या निळावंतीची पोथी कुप्रसिद्ध आहे. जो वाचतो त्याला एक तर वेड तर...

मिकी

इमेज
मिकी वडिलोपार्जित व्यवसाय असताना तो पुढे सुरू न ठेवता मुलाला स्वत:चं काही तरी वेगळं करायचं आहे, ही झाली घराघरांत दिसणारी एक सिच्युएशन. पण यावर किती वेगळ्या पद्धतीनं विचार होऊन काय काय होऊ शकतं, हे आपण अनेक सिनेमांमधून बघितलं आहे. मग त्यात येणारी रडारड, नको इतके इमोशनल सीन हे सगळं आलंच. नाटकातही त्याला वेगळा अपवाद येणार नाही, असं वाटत होतं. पण ‘मिकी’ हा एक स्ट्राँग अपवाद आहे. मुळात ‘मिकी’मध्ये अशी काही स्टोरी असेल, हेच मुळात वाटलं नव्हतं. सन १९८४मध्ये पुणे शहरात केशकर्तनालय (सलून) कसं असेल, त्याचा उत्तम सेट पडदा उघडल्यावर आपल्या समोर येतो. सखाराम (विराजस कुलकर्णी) यांचा हा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. त्यांचा मुलगा केशव (शिवराज वायचळ) हा व्यवसाय व्यवस्थित सांभाळतोय. त्याला अँथनी (सूरज पारसनीस) हा मित्रही मदत करतोय. दुकानाच्या जागेचा मालक पैशांचा तगादा लावत असल्यानं सखाराम आणि केशव त्रस्त आहेत. यावर उपाय आहे; पण त्यांच्या हाताला तो सहजासहजी लागणारा नाही. त्यांच्या एका चुलत भावाच्या नावावर बरीच प्रॉपर्टी आणि रक्कम सखारामच्या वडिलांनी करून ठेवली आहे. पण तो बेपत्ता आहे. त्यात केशवच...

विचारप्रवर्तक 'फास्ट'

इमेज
विचारप्रवर्तक ‘फास्ट’ काल बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा ‘डोंबिवली फास्ट’ बघितला. रात्री साडेबारा वाजताच्या शांततेत सुरू झालेल्या पिक्चरच्या सुरुवातीला असलेल्या मोन्ताजमुळं बाहेरची शांतता अंगावर आली. पूर्वी पाहिला होताच. पण प्रत्येक वेळी एखादी कलाकृती बघताना ती नव्यानं पाहिली जाते. कालही तेच झालं. माधव आपटेचा (संदीप कुलकर्णी) मोनोलॉग, इन्स्पेक्टर अनासपुरेंचे (संदेश जाधव) मधले मधले डायलॉग जास्त विचार करायला लावणारे ठरले. अनासपुरेंचे बॉस (नाव आठवत नाही) आणि केशव जोशी (चंद्रकांत गोखले) यांच्या वाक्यांमुळं २००६ सालचं असलेलं वास्तव आजही बदलेलं नाही हे जाणवलं. ज्यांनी हा सिनेमा अजूनही बघितला नसेल आणि ज्यांना आता नक्की काय झालं होतं ते आठवत नसेल, त्यांच्यासाठी थोडक्यात स्टोरी सांगतो. माधव आपटे हा कनिष्ठ मध्यमवर्गीय मनुष्य मुंबईस्थित एका बँकेत अधिकारी. सुसंस्कृत आणि सुशिक्षित असलेल्या माधवला त्याच्या आजूबाजूला वावरणाऱ्या माणसांच्या नसानसांत भिनलेला भ्रष्टाचार सहन होत नसतो. त्याची बायको अलका (शिल्पा तुळसकर) एक सर्वसामान्य गृहिणी. दोन्ही मुलांना आणि सध्याच्या कलियुगात कालबाह्य होत जाणाऱ...

कौतुक कशाचं करावं?

इमेज
कौतुक कशाचं करावं? हा प्रश्न आजकाल कोणाला पडताना दिसत नाही. लोक दिसेल त्या गोष्टीचं कौतुक करत बसतात. एक तर इथे किंवा प्रत्यक्षात. जी गोष्ट सर्वसामान्य लोक सहसा करायला जात नाहीत, ती गोष्ट जर एखाद्या व्यक्तीने करून दाखवली तर त्याचं कौतुक करावं असं मला वाटतं. ती गोष्ट वाईट नसावी हा तर झाला बेसिक नियम. आधी एखादी गोष्ट सुरू असेल, ती कालानुरूप बदलत जाऊन बंद झाली आणि तरीही ती कोणीतरी करत आहे, तर मग करा त्याचं कौतुक. उदा. सकाळी उठल्यावर रोजच्या रोज आंघोळ करून देवाला नमस्कार करून मगच बाहेर पडणे, संध्याकाळी हातपाय धुवून देवासमोर बसून परवचा म्हणणे इत्यादी. या गोष्टी आता ठरावीक ठिकाणीच सुरू असलेल्या दिसतात. काही काळानं त्या बंदच होण्याच्या मार्गावर आहेत. काही लोक ही परंपरा आवर्जून जपत आहेत. पण सर्वसामान्य लोकांनी वागण्याचे काही अलिखित नियम असतात. उदा. वाहतुकीचे नियम पाळणे, मोठ्यांचा आदर राखणे, शक्यतो व्यसने न करणे, समाजात वावरताना व्यवस्थित वागणे (याच्या व्याख्या बऱ्याच लोकांनी स्वतःसाठी काही ठरवून घेतल्या आहेत.) कोणाचं कौतुक? कोणत्याही व्यसनी माणसाने सगळी व्यसने सोडून नॉर्मल आयुष्य जग...

वरवरचे नव्हे; खोलवरचे वधू-वर

इमेज
वरवरचे नव्हे; खोलवरचे वधू-वर गेल्या काही वर्षांपासून लग्न जमणं आणि मग ते टिकवणं हे एक टास्क झालं आहे. आता मात्र लग्न जमणं हेच एक टास्क आहे. मुला-मुलींची वयं वाढत जातात आणि मग लग्न जुळवणं ही त्यांच्याबरोबरच त्यांच्या घरच्यांची, विशेषतः आयांची डोकेदुखी होऊन बसते. मग ही मुलं-मुली वेगवेगळ्या आयडिया काढतात. काही वेळा त्यातून इगो जपला जातो; पण सुख मिळेलच याची शाश्वती नसते. असे काही उपाय करून झाल्यावर किंवा कोणाचे तरी ऐकून/बघून झाल्यावर एक रिअलायझेशन होतं आणि तेच महत्त्वाचं ठरणारं असतं, असं माझं मत आहे. ‘वरवरचे वधूवर’ या दोन अंकी नाटकाची थीम हीच आहे. नाटकाची सुरुवात होते, तीच फोर्थ वॉल मोडून. नायिका विशाखा (सखी गोखले) मंचावर येते, तेव्हाच कळतं, की हे काही नेहमीसारखं नाही. काही तरी वेगळं घडणार आहे. समजायला आणि उच्चारायला अतिशय क्लिष्ट असं तिचं प्रोफेशन असतं. नाटकातला नायक मोहितचंही (सुव्रत जोशी) तेच प्रोफेशन असतं. आता कसंय... मालिकांमध्ये नायक नायिका भेटणार हे आपल्याला माहिती असतं. पण ते कसे भेटणार आणि गोष्टीचा शेवट होण्यापूर्वी त्यांच्यात काय गोष्ट घडणार याची आपल्याला उत्सुकता असत...