पोस्ट्स

जून, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रवास

इमेज
...आणि तो अमेरिका प्रवास संपवून युरोप प्रवासाला निघाला.  हे शेवटचं वाक्य लिहून तिनं वही बंद केली आणि ज्या लेखिकेसाठी म्हणून ती हे लिहीत होती, त्या लेखिकेकडं वही द्यायला ती घरातून बाहेर पडली.  मार्गी. कनिष्ठ मध्यमवर्गीय दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेली मुलगी. आपल्या वडिलांना नोकरीतून फार पैसे मिळत नाहीत आणि जे मिळतात ते पुरवण्यात आईची तारांबळ उडते हे ती अगदी लहानपणापासूनच बघत आली होती. त्यामुळं तिला काटकसरीचं महत्त्व समजलं नसतं तरच नवल! आपल्याला जगभर फिरायचं होतं पण ते जमलं नाही, निदान मुलीला तरी ते करायला मिळावं अशी मार्गीच्या आईवडिलांची इच्छा होती. बेताचीच परिस्थिती आहे हे माहीत असूनही. म्हणून तर त्यांनी तिचं नाव मार्गी ठेवलं होतं. मार्गीनंसुद्धा तिचा प्रवास कधीच थांबवला नाही. फक्त तिचा प्रवास तिच्या आईवडिलांच्या स्वप्नातल्या प्रवासापेक्षा थोडा वेगळा होता. तिचा प्रवास म्हणजे कामानिमित्त किंवा कॉलेजला जाण्यासाठी शहराच्या या टोकापासून ते त्या टोकापर्यंत असं दररोज जाऊन येऊन १९ किलोमीटर चालणे. दररोज अभ्यासाला लवकर जावं लागतं आणि उशिरापर्यंत थांबावं लागतं हे कारण सांगून ती घरातून ...

सोमनाथ छावणी : एक विलक्षण अनुभूती

इमेज
आपल्याला आपल्या शहरांमध्ये दिव्यांगांना सहानुभूती दाखवणारे पुष्कळ लोक दिसतात. मात्र इथं तसं नव्हतं. सर्वांमध्ये समानतेची भावना होती. धर्म, जात-पात याबद्दल तर कधी विचारही आला नाही. पाणी जरी प्यायचं असेल तरी कोणीही यायचं आणि कोणाच्याही बाटलीतून पाणी प्यायचं. यासाठी विचारण्याची, परवानगी घेण्याची गरज कधी वाटली नाही, ही खरंच खूप चांगली गोष्ट या श्रमसंस्कार छावणीमधून शिकण्यासारखी होती. 'जोडो जोडो, भारत जोडो!' ही घोषणा जेव्हा पहिल्यांदा दिली तेव्हा अंगात खूप ऊर्जा संचारल्यासारखं वाटलं. बाबा आमटेंनी उभारलेल्या सोमनाथ प्रकल्पाबद्दल फार काही माहिती नव्हती. मात्र जेव्हा समजलं तेव्हा जायची खूप इच्छा झाली. बऱ्याच उचापती केल्यानंतर तिथं जायचं नक्की झालं. खूप तापमान असतं ही भीतीही दाखवली गेली मला. पण जायचं ठरवलं असल्यानं मी याकडे फार लक्ष दिलं नाही.  चंद्रपूरला उतरल्यावरच मला तिथं असलेल्या कडकडीत उन्हाळ्याची जाणीव झाली. बसस्टँडवरून बस पकडून थेट मूल या गावी उतरलो. तिथून सोमनाथ प्रकल्पामध्ये नेण्याची व्यवस्था प्रकल्पातील स्वयंसेवक करतील असं सांगण्यात आलं होतं. त्याप्रमाणं स्वयंसेवकांनी मूल बसस्...

सावल्या

इमेज
आज जसा मी पल्लवीशी बोललो तसं उद्या रमाशी बोलेन. म्हणजे तेवढीच मुलींशी बोलायची सवय होईल. मला मित्र पुष्कळ आहेत. पण मुलींशी बोलायला गेलं की नको नको वाटतं. का कुणास ठाऊक! पण त्या माझ्याशी बोलणार नाहीत, मला हसतील अशी भीती वाटते सारखी. उद्या रमाशी काय काय बोलायचं आणि ती कशी बोलेल याची रंगीत तालीम करत आरशासमोर उभा होतो. अचानक आरशात माझ्याऐवजी ती सावली दिसली आणि माझी झोप मोडली. दचकून उठलो. घामाघूम झालो होतो. माझ्या तोंडावरून काहीतरी हलल्यासारखं वाटलं. असं वाटलं कोणीतरी माझ्या तोंडावरून हात फिरवला. मला कोणी कानाशी ढोल वाजवले तरी जाग येत नाही एरवी. पण गेले ४-५ दिवस अशीच जाग येत होती. कोणीतरी तोंडावरून हात फिरवतंय असा भास होत होता. म्हणजे रात्री किंवा पहाटे अशा ठरावीक वेळेला नव्हे, तर १२ वाजल्यापासून ते ४ वाजेपर्यंत कधीही जाग येत होती. आठवडाभर असा घाबरत काढल्यावर मी एक दिवस ठरवलं, की आज काहीही होऊ दे जागं राहायचं. झोपायचंच नाही रात्री. तसं ठरवल्याप्रमाणं मी खोलीत एका कोपऱ्यात लपलो. मी गादी घालून खाली झोपतो. कॉटवर नाही झोपत. नेहमीसारखी खाली गादी घातली, त्यावर उशा ठेवल्या आणि कोणीतरी झोपल्याचा भास...