पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मैत्री (ण)?

इमेज
"एक चहा..." "बसा." मला खरंतर भूकही लागली होती; पण पांडूनं अशी ऑर्डर सोडल्यावर मी माझं वाक्य पूर्ण न करताच एका कोपऱ्यात बसलो. पांडू म्हणजे आमच्या शाळेच्या बाहेरचा चहावाला. शाळेबाहेरच त्याची चहाची टपरी होती. ४-५ वर्षांपूर्वी आम्ही दहावी झाल्यानंतर एकदा त्याच्याकडं चहा प्यायलो होतो. एकदाच... कारण तेव्हा खिशात पैसेच नसायचे. आज मला काही चहा प्यायची खास इच्छा अशी नव्हती. पण या पावसात मी भिजत आणि कुडकुडत आलो होतो, तेही एका फोनवर. फक्त विज्यामुळं!  विज्या म्हणजे विजय पाटील. आम्ही भेटलो तिसरीत असताना. त्यानंतर एकाच वर्गात होतो दहावीपर्यंत. आमची पहिली भेटही म्हणावी तर एकदम मस्त, नाही तर विचित्र होती. माझ्या आई-वडिलांची शहरात बदली झाल्यानंतर मीही आलोच त्यांच्यासोबत. त्यांनी जशी नोकरी बदलली, तशी मला शाळा बदलावी लागली. तिसरीला शाळेचा पहिलाच दिवस होता. नवीन गणवेश, नवीन बाई, नवीन शहर आणि त्याहीपेक्षा नवीन गोष्ट म्हणजे आमच्या वर्गात मुली होत्या. माझ्या आधीच्या शाळेत तर मुली नव्हत्याच; पण इथं तर वर्गात निम्म्या मुली आणि निम्मी मुलं. सुरुवातीला प्रार्थना झाली. त्यानंतर प्रत्येक जण उभ...