पोस्ट्स

एप्रिल, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शोध

इमेज
‘काय करू मला काहीच समजत नाहीए. हिचं बरं आहे. मस्त पोरगा गटवलाय तिनं. पण माझं काय? मला हिच्यासारखं आयुष्य जगायचं नाही ना... हरामखोर साली. मी असं करणार आहे, तसं करणार आहे. माझ्याशी असं वागणारा नवरा असेल, तरच मी लग्न करीन, नाही तर बिन लग्नाची राहीन... आणि आता काय? आईबापानं एक श्रीमंत स्थळ काय बघून दिलं, ‘माय हबी, बेस्ट हबी इन द वर्ल्ड’ म्हणायला लागलीए... जसं काय जगातल्या सगळ्या बायांच्या नवऱ्यांना भेटून आलीए....’ प्रियाच्या मनातले विचार थांबतच नव्हते. तिची प्रचंड चिडचिड होत होती. सहनच होत नव्हतं तिला नेहाचं वागणं. खरं तर या दोघी लहानपणापासूनच्या मैत्रिणी. गेल्या २० वर्षांपासून बाजूबाजूच्या बिल्डिंगमध्ये राहत होत्या. आता दोघींची वयं २५ झालेली. नेहाचं मागच्याच वर्षी लग्न झालं. तेव्हापासून प्रियाच्या घरच्यांनी तिच्याही मागं लग्नासाठी किरकिर सुरू केली होती. पण.... ‘हे काही माझं लग्न करायचं वय नाही. आत्ता कुठं जॉब सुरू झाला आहे माझा. मनासारखा पगार मिळू दे, जरा सेटल होऊ देत. मग बघू लग्न वगैरे....’ ‘अगं आता २५ झालीस तू. नेहाचं पण बघ योग्य वयात लग्न झालं. उशिरा लग्न झालं की अडचणी येऊ शकतात. आणि प...

मध्यम काही नसतंच का?

इमेज
There is nothing such as Black and White now. Everything is Grey.  हे वाक्य जगजाहीर आहे. पण लोक अजूनही ते ॲक्सेप्ट करायला तयार नाहीत. निदान त्यांच्या वागण्यातून तरी तसंच वाटतं. प्रत्येक वेळी दोन टोकं प्रामुख्यानं दिसतात. सण, राजकारण, संगीत, परंपरा, लेखन, माणसं, चित्रपट, जात, धर्म, भाषा, खेळ, तंत्रज्ञान, भावना, कुटुंब व्यवस्था......... ही यादी न संपणारी आहे. अशी जी मनात येतील ती क्षेत्रं निवडली आणि त्यावर थोडा जरी विचार केला तरी आपल्याला ही दोन टोकं लगेच दिसतील. ही दोन टोकं काही आत्ता तयार झालेली नाहीत. फार पूर्वीपासून आहेत; पण सोशल मीडियामुळं ती जरा जास्तच टोकदार झाली आहेत.त्याला करोना काळही तितकाच जबाबदार आहे असं मला वाटतं. माणसानं १०० चांगल्या गोष्टी केल्या आणि एक जरी चूक केली तरी ती चूकच लक्षात राहते, असं म्हटलं जातं. त्यात खोटं काहीच नाही. मनुष्यस्वभाव आहे तो. पण मग आपण बदलणार कधी? देश सुधारतोय, असं एकीकडं म्हणायचं; पण विचार मागासलेलेच ठेवायचे, असं कसं चालेल? सतत आपलं एकच एक टेप लावून लोक कंटाळत कसे नाहीत? प्रत्येक वेळी हंगामी बोलणं आणि लिहिणं कसं जमतं? उदा. आला एखादा सण की त्य...