पोस्ट्स

मे, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चांगलं काय आणि वाईट काय?

इमेज
जावेद अख्तरांनी एका मुलाखतीत सांगितल्याचं चांगलं आठवतंय. ‘ओम शांती ओम’ या पिक्चरमधलं ‘दिल में मेरे है दर्द-ए-डिस्को’ हे गाणं का आणि कसं लिहिलं याविषयी ते बोलत होते. ते गाणं असंबद्ध लिहिण्यासाठी त्यांना मेहनत करावी लागली होती. गाण्यातल्या ओळींमध्ये कशाचाच कशाला अर्थ लागू नये, यासाठी त्यांना फार विचार करून ते गाणं लिहावं लागलं होतं, असं त्यांनी या मुलाखतीत सांगितलं आहे. सगळी मुलाखत ऐकायची असेल, तर ती आहे यूट्यूबवर. सध्या ‘असंबद्ध लिहिणे’ या गोष्टीसाठी वेगळे कष्ट करावे लागत नाहीत अशीच परिस्थिती आहे. कोणीही उठतं आणि काहीही लिहितं. पण याचा त्रास होत नाही; करून घेतला नाही तर. हे असलं काहीही लिहिलेलं लोक डोक्यावर घेतात ना उगाच, त्यांचा राग येतो; त्याचा त्रासही होतो. फेसबुकवर लिखित गोष्टी जास्त आणि इंस्टाग्रामवर व्हिडिओचं प्रमाण जास्त आहे. काहीही समजत नाही हे लोक जे काही लिहितात किंवा व्हिडिओ करतात त्यातून. पण लोक त्यांना डोक्यावर घेतात; कारण त्यांना चांगलं म्हणजे काय, हेच माहीत नसतं असं आता लक्षात यायला लागलंय. ओळखीच्या माणसानं केलंय म्हणून हे लोक दाद आणि महत्त्व (अवास्तव) देतात हे जरी मान्य ...