पोस्ट्स

सप्टेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कंटाळलात? मग आनंद माना!

इमेज
  कंटाळलात? मग आनंद माना! कंटाळा येणे ही एक सकारात्मक गोष्ट असू शकते; कारण त्यातून सर्जनशीलतेला चालना मिळते, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. आता कंटाळा आल्यावर चिडचिड किंवा त्रागा न करता आपण काही नवे करू शकतो, असा विचार करायला हरकत नाही. ‘मला कंटाळा आला आहे’ किंवा ‘मला काहीही करायचे नाही’ हे वाक्य आपल्यापैकी बरेच जण रोज ऐकतात किंवा आपण ते स्वतःच वापरतो. मात्र, एखादी गोष्ट कंटाळवाणी कशामुळे होते, याचा कधी विचार केलाय? त्याची असंख्य कारणे आहेत. सध्या आपल्याला सतत काही तरी सांगायची किंवा एखाद्या गोष्टीवर व्यक्त होण्याची सवय आहे. एक मिनिट जरी काही केले नाही, तरी आपल्याला कंटाळा येतो आणि कंटाळा येऊ नये, म्हणून जे काही करता येईल, ते आपण करत राहतो. कधी आपल्याला रोजच्या कामाचाही कंटाळा येतो. अशा वेळी आपण पहिली गोष्ट काय करतो? ती म्हणजे सोशल मीडियावर एक फेरफटका मारणे. त्याच्या पुढची पायरी म्हणजे कोणत्या तरी साध्या गेमची मोबाइलवर पटकन एखादी लेव्हल खेळणे. हे केले नाही, तर कुणाचा काही मेसेज आला आहे का, हे तर प्रत्येक जण पाहतोच. तेही करत नसू, तर मोबाइल उघडून आपण अक्षरश: काहीही करू;...