पोस्ट्स

मार्च, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अभिनेत्री

इमेज
अगदी लहान असल्यापासून मी पिक्चर बघत आलोय. पण तुझी आवडती हिरॉइन किंवा हिरो कोण, हा प्रश्न विचारल्यावर अजूनही गोंधळतो मी. कायमस्वरूपी कोणी तरी आवडतं असं काही नाहीच. त्या त्या वेळेला हिरो किंवा हिरॉइन आवडायच्या. काही जुने आणि मी न बघितलेले सिनेमे आता बघतो, तेव्हा त्यातले कलाकार आवडतात. पण मग त्या वेळी कथा, दिग्दर्शन, फ्रेम, पटकथा किंवा यासारख्या अनेक गोष्टी बाजूला ठेवता येत नाहीत. त्यांचा विचार होतोच. पण हे सगळं कळत नसेल किंवा कळत नव्हतं, त्या वेळी कोणी आवडलं होतं की नाही, हे मीच मला विचारलं. तेव्हा सापडलं उत्तर. मग मी जरा विचार केला, की बाकीच्या लोकांसारखं नाही; पण एखादी व्यक्ती आपल्याला समोर दिसणार असेल आणि त्या वेळी कथा वगैरेचा विचार करणार नसू, तर स्क्रीनवर कोणाला बघायला आवडेल? यानंतर काही नावं समोर आली. ‘डॉन’ नावाचा तेलगू किंवा तमिळ सिनेमा मी बघितला होता लहान असताना. स्पष्ट आठवतोय तो. (तो माझ्यासकट सगळ्यांनी ‘डॉन नं. १’ या नावानं हिंदीत डब झालेला बघितला असेल.) २००८च्या मे महिन्यात तिरूपतीहून पुण्याला चारचाकीतून परत येत होतो. तेव्हा त्या ड्रायव्हरनं लावला होता. मी बहुतेक पाचवीत होतो. ए...