चेहरे

चेहरे




किसी रोज़ तुम से मुलाकात होगी
मेरी जान उस दिन मेरे साथ होगी
मगर कब ना जाने ये बरसात होगी
मेरा दिल है प्यासा मेरा दिल अकेला
ज़रा तस्वीर से तू निकल के सामने आ मेरी महबूबा
मेरी तक़दीर है तू मचल के सामने आ मेरी महबूबा
मेरी महबूबा

काही सिनेमे पाहिल्यानंतर त्यातली गाणी मनात घर करतात, तर काही सिनेमे न पाहताच त्यातली गाणी ती जागा मिळवतात. ही गाणी कधी पहिल्यांदा ऐकलेली असतात, ते आठवतही नाही; पण ती परत कधी तरी ऐकल्यावर काही तरी डोळ्यासमोर दिसत राहतं, काही सिनेमातले रेफरन्स डोळ्यासमोरून सरकत जातात किंवा काही चेहरे पाहिल्यानंतर अशी ही गाणी आठवत राहतात. मग ती सर्च करून करून ऐकली जातात. तसंच परदेस पिक्चरमधलं हे गाणं.

अचानक आठवलं, का कुठं कोणी गुणगुणताना ऐकलं ते आता आठवत नाही. पण डोक्यातून जाईना. त्यामुळं डोक्यात फिट्ट बसलेला गीता गोविंदममधला सीन पुन्हा डोळ्यासमोर नाचायला लागला. विजय देवरकोंडासमोर त्याचं लग्न ठरताना आणि होतानाची प्रोसेस दिसत असते. पण समोरची ती मुलगी कोण, हे त्याला माहीत नसतं, म्हणजे तिचा चेहरा दिसत नसतो. एके दिवशी तो रश्मिकाला कुठं तरी पाहतो आणि तो अस्पष्ट, धूसर चेहरा एकदम त्याच्या डोळ्यासमोर क्रिस्टल क्लिअर होतो.

गेल्या काही वर्षांपासून माझंही तसंच होतंय, असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे मी देवरकोंडा आणि मला रश्मिका मिळावी, असं माझं म्हणणं किंवा अपेक्षा नाही.

पण मंगेश पाडगावकर म्हणतात तसं,

मी कुठं म्हणतो परी मिळावी
फक्त जरा बरी मिळावी.

स्वप्नात तशा खूप भेटतात
कधी तरी खरी मिळावी.

एवढीच माफक अपेक्षा आहे माझी. बास्स!

अनेक चेहरे नाचतात हो डोळ्यासमोर. पण अजून देवरकोंडाला त्याची रश्मिका काय दिसली नाही. इतकंच काय ते.

ती जर कधी दिसली आणि प्रत्यक्षात जर भेटली, तर मग अदनान सामी यांना डोळ्यासमोर ठेवून, त्यांनी गायलेलं एकदा तिला ऐकवायचं आहे.

तू अगर कह दे मुझे
चाँद भी ले आऊँ, जान-ए-जाँ, जान-ए-जाँ
एक तारा माँग ले
आसमाँ ले आऊँ, जान-ए-जाँ, जान-ए-जाँ

याद तू जब आए, नींद भी ले जाए
ख़्वाबों के जंगल में छुप जाए, छुप जाए

ये ज़मीं रुक जाए
आसमाँ झुक जाए
तेरा चेहरा जब नज़र आए
हो, तेरा चेहरा जब नज़र आए
हो, तेरा चेहरा जब नज़र आए

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

द व्हाइट टायगर

वरवरचे नव्हे; खोलवरचे वधू-वर